तुम्हीही करोडपती होऊ शकता; हा आहे गुंतवणुकीचा सोपा मंत्र

Spread the love

गुंतवणुकीचे नियोजन

तुम्हालाही तुमच्या भविष्यातील स्वप्न पूर्ण करायचे असतील. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या भविष्यकाळासाठी आर्थिक निधी असणे फार गरजेचे आहे.आणि त्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आणि याच गुंतवणुकीसाठी तुम्ही पीपीएफ चा पर्याय विचारात घेऊ शकता. पीपीएफ या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याची हमी सरकार देत असल्याने, यामधील गुंतवणूक सुरक्षित असल्याचे म्हणणे काही हरकत नाही.

करात सवलत

जर तुम्ही पीपीएफ मध्ये पैसे गुंतवल्यास प्रत्येक वर्षी दीड लाख रुपयांवर कलम 80c अंतर्गत सवलत मिळू शकते. त्यामुळे या योजनेमध्ये तुम्ही कर सवलतीसाठी ही गुंतवणूक करू शकता व चांगला परतावा मिळवू शकता.

गुंतवणूक आणि परतावा

या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी काही अटी व नियम लागू केले आहेत. पीपीएफ या योजनेमध्ये तुम्हाला वर्षभरात किमान पाचशे रुपये गुंतवणे हे बंधनकारक आहे. पीपीएफ मध्ये तुम्हाला 7.1% व्याजानुसार तुम्हाला परत हवा दिला जातो इथे चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते.

उदाहरणार्थ – पीपीएफ या योजनेमध्ये तुम्ही दरमहा 8500 रुपये प्रमाणे 30 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास त्यावर 7.1% व्याजाप्रमाणे तुमच्या 30 लाख 60 हजार रुपयांवर व्याज मिळून तब्बल 1कोटी 1 लाख 87 हजार एवढा परतावा मिळू शकतो.तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास नक्कीच करोडपती होऊ शकता.

Leave a Comment